नाशिकमध्ये ५८, दिंडोरीत ६४ टक्के मतदान

नाशिकमध्ये ५८, दिंडोरीत ६४ टक्के मतदान

भगूर येथील मतदान केंद्रावरही मतदारांचा उत्साह कायम होता.

किरकोळ अपवाद वगळता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी २९ एप्रिलला शांततेत मतदान पार पडले. सूर्यदेवाने ऐन मतदानाच्या दिवशी कृपा केल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केंद्रावर रांगा लावल्या. सायंकाळी सातपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार नाशिक मतदारसंघात सरासरी ५६ टक्के मतदान झाले. गत निवडणुकीत नाशिक मतदारसंघात ५८ टक्के मतदान नोंदवले गेले होते. दिंडोरी मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी सायंकाळी ७ पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

नाशिक मतदारसंघातील १८ तर दिंडोरी मतदारसंघातील ८ ईव्हीएम बंद पडले. दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदानावर त्यांचा परिणाम दिसून आला. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ला मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले. या मॉकपोल दरम्यान नाशिकमध्ये मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅट बंद पडले. मतदान केंद्राध्यक्षांनी तातडीने हे मशिन बदलून दिले. शहर परिसरात सकाळी चार तासांत मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. त्यात सकाळी ९ पर्यंत फारशी गर्दी नसली, तरी ९ नंतरच्या दुसर्‍या टप्प्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. दुपारी ३ पर्यंत नाशिकमध्ये ४१ टक्के तर दिंडोरीत ४५.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ४ नंतर मतदान केंद्रांवरील गर्दी वाढू लागली. अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी ६ नंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती. शहरातील बी.डी.भालेकर हायस्कूल, रचना विद्यालय, दसक पंचक, फुलेनगर परिसरातील काही केंद्रांवर ७ पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सिन्नरमध्येही काही मतदान केंद्रांवर ६ नंतर मतदान सुरू असल्याचे दिसून आले.

सायंकाळी सहानंतर केंद्र परिसरात असलेल्या मतदारांना रांगेत उभे राहण्याचे आवाहन करत केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तसेच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना उलटया क्रमाने चिठ्ठ्यांचे वाटप करत मतदान करण्यास अनुमती देण्यात आली. यावेळी काही केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

उमेदवारांचे भाग्य सीलबंद

नाशिक लोकसभा निवडणुकीत यंदा १८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून या उमेदवारांचे भाग्य आज सीलबंद झाले. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, अपक्ष अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात प्रमुख लढत आहे. दिंडोरी मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे धनराज महाले, माकपचे जीवा पांडू गावित यांच्या प्रमुख लढत होत आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

८१ यंत्र पडले बंद

मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारसंघात ८१ मतदान यंत्र बंद पडले. यात नाशिकमध्ये १४ बॅलेट युनिट, ७ कंट्रोल युनिट, तर २० व्हीव्हीपॅट बंद पडले. दिंडोरी मतदारसंघात ७ बॅलेट युनिट, १७ कंट्रोल युनिट, तर १६ व्हीव्हीपॅट पडले. बंद पडलेले मतदान यंत्र प्रशासनामार्फत तातडीने बदलण्यात आले व संबधित मतदान केंद्रावर दुसरे मतदान यंत्र उपलब्ध करण्यात आले. त्यामध्ये मतदान प्रक्रिया सरू होण्यापूर्वी ४८ मतदान यंत्र बंद पडले.

मतदान कमी होण्याची कारणे

मतदान वाढीसाठी झालेले प्रयत्न

First Published on: April 29, 2019 9:44 PM
Exit mobile version