नाशिक शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ७५ अपघात, ३४ बळी

नाशिक शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ७५ अपघात, ३४ बळी

रस्ते अपघातांची मालिका काही केल्या संपत नसून, हेल्मेटसक्ती कठोर करण्यात येऊनही नियम पायदळी तुडवले जात असल्याची शोकांतिका आहे. परिणामी, शहरात ११ महिन्यांत तब्बल ७५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे अपघात झाल्याचे दिसून येते. या अपघातांमध्ये ३१ जीवघेणे असून, ३४ दुचाकीचालकांनी जीव गमावला आहे.

हेल्मेट वापरले असते, तर कदाचितद त्यांचे प्राण वाचले असते, असे कुटुंबियांसह पोलिसांकडूनही सांगण्यात येते. जीवघेण्या अपघातांमध्ये ३० पुरुष आणि ४ महिलांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, विनाहेल्मेटमुळे ११ महिन्यात ३६ गंभीर अपघात झाले आहेत. त्यात ४९ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात वर्गमर्यादेचे उल्लंघन केल्याने झाले आहेत. विशेष म्हणजे, कोरोना काळात अपघात कमी होते. तर निर्बंध शिथील होताच अपघातांची संख्या वाढली.

अशी आहेत अपघातांची कारणे

दुचाकीचालक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवतात. शिवाय, शहरातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांवरील कामांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवता. त्यातून जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ७५ विनाहेल्मेटमुळे अपघात झाले आहेत. दुचाकीचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा. आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे, याची आठवण ठेवावी.
– सीताराम गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक

First Published on: December 10, 2021 9:22 AM
Exit mobile version