आईवरुन शिवी देणाऱ्याचा केला खून, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

आईवरुन शिवी देणाऱ्याचा केला खून, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

प्रातिनिधीक फोटो

भांडणादरम्यान आईवरुन शिवीगाळ केल्याचा राग अनावर झाल्यानं आरोपीनं एकावर चाकूहल्ला केला होता. या घटनेत जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खंबाळा गावातल्या गणेश ऊर्फ विन्या राजाराम जाधव याने हा चाकूहल्ला केला होता. २०१७ मध्ये भद्रकालीतल्या जलउपसा केंद्रनजीक गणेशने दिंडोरी गावातल्या संपत काशीनाथ कडाळे याच्यावर चाकतूहल्ला केला होता. या घटनेत संपत कडाळे याचे आरोपी गणेश जाधव याच्यासोबत किरकोळ कारणातून भांडण झाले होते. त्संयात कडाळे याने गणेशला आईवरुन शिवीगाळ केली. त्याचा राग अनावर झाल्याने गणेशने खिशातील चाकू काढून संपतवर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी केला. डॉ. भुजबळ यांनी आरोपी गणेश जाधवविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक पाचचे व्ही. पी. देसाई यांनी गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

First Published on: September 30, 2020 7:01 PM
Exit mobile version