..रस्त्यासाठी शेकडो महिलांची निदर्शने; पंतप्रधानांना लिहिले पत्र

..रस्त्यासाठी शेकडो महिलांची निदर्शने; पंतप्रधानांना लिहिले पत्र

पळसे येथील एमआयडीसी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी करत महिलांनी धरणे आंदोलन करत पंतप्रधान कार्यालयाला निवेदन पाठवले आहे. रस्ता झाला नाही तर सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

सिन्नर एमआयडीसी साठी पाणी उपसा करण्यासाठी पंपहाऊस बनविण्यासाठी दारणा नदी काठी जागाा घेऊन पळसे गावातून शेवगे दारणा गावाकडे जाणारा शिवरस्त्याच्या बाजुने पंचवीस वर्षांपुर्वी संपादीत केला परंतु एमआयडिसी कडुन कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे कोणतेही काम केले नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत, या तीन किलोमीटरच्या अंतराचा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असुन या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेकडुनही निधी वापरता येत नाही, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यां यांचे रस्त्याने जाणे येणे कठिण झाले आहे, या विषयावर येथील पळसे व शेवगेदारणा भागातील शेकडो महिलांनी आज निदर्शने केली, यावेळी जय एखंडे, पदमा गायधनी, वनिता गायधनी, मीरा गायधनी, मंदा टावरे, मुक्ताबाई गायखे, लिलाबाई गायखे, मनीषा गायखे, मंदा गायखे, जिजाबाई टावरे, सुरेखा कासार, रत्ना गायधनी, मीना टावरे आदी महिलांसह नागरीक उपस्थित होते, येथील रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांनी एमआयडीसी अधिका-यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिली.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, एमआयडीसी अधिकारी आदींना देण्यात आला आहे. दोन महिन्यात कार्यवाही झाली नाही तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

First Published on: August 26, 2019 4:57 PM
Exit mobile version