अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादेत वाढ

अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादेत वाढ

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.

First Published on: June 24, 2021 10:50 AM
Exit mobile version