निवडणुका आल्या की जातपातीचे राजकारण केले जाते, भुजबळाचे वक्तव्य

निवडणुका आल्या की जातपातीचे राजकारण केले जाते, भुजबळाचे वक्तव्य

आमच्याबाबतीत वेगळीच परिस्थिती आहे. इतर वेळा सगळं व्यवस्थित करतो. पण निवडणुका आल्या की जात. शाहू फुले आंबडेकर हे आमचे दैवत आहेत. शाहू महाराजांचे वंशज समंजस, उतावीळ नाहीत आणि काय गाठायचे हे हे त्यांना माहिती आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्याचे कारण नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाला भुजबळने कायम सभागृहात देखील पाठिंबा दिला. पण भुजबळ आपला दुष्मन असल्याचे मत तयार करण्याचा काहींचा प्रयत्न सतो, असा आरोप छगन भुजबळांनी केला काही जण मला विरोधक असल्याचे सांगत असतात.

मराठा समाजाला आरक्षण देणे महत्त्वाचे की छगन भुजबळांवर टीका करणे महत्त्वाचे. संभाजीराजेंनी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली. आपला लढा व्यवस्थेशी आहे. आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या. जे प्रस्ताव मांडले गेले, ते सरकारने तातडीने मंजूर करण्यात आले. यापुढेही असेच धोरण सरकारचे असेल. चर्चेशिवाय मार्ग नाही. चर्चा करून कोर्टात जावे लागेल. मी तुमच्याबरोबर आहे असे ते म्हणाले.

First Published on: June 22, 2021 10:30 AM
Exit mobile version