ना हुकूमत से, ना नोट से, किस्मत बदलती है वोट से

ना हुकूमत से, ना नोट से, किस्मत बदलती है वोट से

स्लोगन स्पर्धेत सादर करण्यात आलेले स्पर्धकांची घोषवाक्ये.

ना हुकुमत से, ना नोट से, किस्मत बदलती है अपनी वोट से, आन बान शान से, वोट करना अपने दिल से, वोट फॉर फ्युचर, प्रगतीचा मार्ग एकच मतदान, यांसारखी आकर्षक व लक्षवेधी स्लोगन स्पर्धकांनी तयार केली. आम्ही सर्वजण मतदानाचा हक्क बजावणारच, तुम्हीसुद्धा मतदानाचा हक्क बजावा, अशी उत्स्फूर्त दाद देत नागरिकांनी स्लोगन बनवणार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. निमित्त होते, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मतदान करा स्लोगन स्पर्धेचे.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २९) मतदान असल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, यासाठी सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मतदान जनजागृती स्लोगन स्पर्धा आयोजित केली. भारतात लोकसभा निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी ६५ च्या पुढे गेलेली नाही. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक सुजाण व जागरूक भारतीय नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा टक्का वाढावा, प्रत्येकाने मतदान करावे, या उद्देशाने सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे कार्यालयात ‘मतदान करा’ या विषयावर स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. अनेकांनी मतदान जनजागृतीसाठी लक्षवेधी, आकर्षक स्लोगन तयार केली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

First Published on: April 29, 2019 4:25 PM
Exit mobile version