बी.एड जागा ४४ हजार, अर्ज ३८ हजार

बी.एड जागा ४४ हजार, अर्ज ३८ हजार

प्रातिनिधीक फोटो

शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता असलेल्या बी. एड. या दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा ऑनलाईन सीईटी घेण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ९० बी. एड. महाविद्यालयांतील ४४ हजार जागांसाठी साधारणत: ३८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. ८ व ९ जूनला होणार्‍या या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. पात्रता असूनही नोकरीची संधी मिळत नसल्यामुळे बी. एड.च्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येते. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे बी. एड. महाविद्यालयात सामाईक प्रवेश प्रक्रियेविषयी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

बी.एड प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणी: गुरुवार २५ एप्रिल २०१९
सीईटी परीक्षा: ८ जून (मराठी माध्यम) व ९ जून (इंग्रजी माध्यम)
सीईटी निकाल : गुरुवार २० जून

जिल्हानिहाय बी.एड कॉलेज

मुंबई-१९, पुणे-१३, कोल्हापूर-८, नागपूर-९, अहमदनगर-५, जळगाव-५, नाशिक-५

मोफत सुविधा केंद्र

बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवेश होत नसल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेश परीक्षा द्यावी. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे महाविद्यालयात मोफत सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. – प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे, अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे बी. एड. महाविद्यालय.

First Published on: April 17, 2019 8:05 AM
Exit mobile version