बार कौन्सिलचा तब्बल सव्वा वर्षांनी निकाल घोषित

बार कौन्सिलचा तब्बल सव्वा वर्षांनी निकाल घोषित

,बार कौन्सिलचा तब्बल सव्वा वर्षांनी निकाल घोषित

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या 25 सदस्य निवडीसाठी 28 मार्च 2018 रोजी मतदान झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2010 नंतर म्हणजेच तब्बल ८ वर्षांनी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडून तब्बल सव्वा वर्षांनी सोमवारी (ता.22) निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये नाशिकचे ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जायभावे तिसर्‍यांदा तर, अ‍ॅड. अविनाश भिडे हेही दुसर्‍यांदा कौन्सिलवर निवडून आले आहेत. अ‍ॅड. जायभावे व अ‍ॅड. भिडे या दोघांनीही यापूर्वी कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले आहे.

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील 311 न्यायालयांमध्ये मतदानप्रकिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी दोन्ही राज्यातील 164 उमेदवार रिंगणात होते. यात नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश होता. दोन्ही राज्यांतील १ लाख 60 हजार वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 610 वकील मतदारांपैकी 3 हजार 250 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड. जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप वनारसे, ऑल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके, अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड. लिलाधर जाधव, अ‍ॅड. अनिल शालिग्राम हे आठ जण निवडणुकीच्या रिंगणात होते.

बार कौन्सिलचे नवनियुक्त सदस्य

अ‍ॅड. अशिष देशमुख, अ‍ॅड. गजानन चव्हाण, अ‍ॅड. विठ्ठल कोंदे देशमुख, अ‍ॅड.परिजात पांडे, अ‍ॅड.राजेंद्र उमाप, अ‍ॅड.जयत जायभावे, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. अविनाश आव्हाड, अ‍ॅड.संग्राम देसाई, अ‍ॅड. वसंत साळुंखे, अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, अ‍ॅड. मोतीसिंग मेहता, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अ‍ॅड.असिफ कुरेशी, अ‍ॅड.उदय वारूंजीकर, अ‍ॅड.मिलिंद थोबडे, अ‍ॅड. अनिल गोवारदिपे, अ‍ॅड. सतिश देशमुख, अ‍ॅड. अमोल सावंत, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. सुभाष घाटगे, अ‍ॅड.सुदीप पसबोला, अ‍ॅड.वसंत भोसले, अ‍ॅड.अहमदखान पठाण.

First Published on: July 22, 2019 9:05 PM
Exit mobile version