धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका

धरणामध्ये XXXपेक्षा  थुंकणं चांगलं; संजय राऊतांची अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्यांचा थुंकण्याचा व्हिडीओही व्हायरल झाल्यानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला असून राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येकाने तारतम्य ठेवून बागण्याची भूमिका मांडली. यानंतर संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली. (Better to spit than … in a dam, Sanjay Raut’s low-level criticism of Ajit Pawar)

संजय राऊतांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो
संजय राऊतांना थुंकल्याबद्दल माफी मागणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, रोज 130 कोटी जनतेला माफी मागावी लागेल. कारण रोज कोणी ना कोणी थुंकत असतो. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही, राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांचे नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली आणि त्यातून ही कृती झाली. यांना काही कळतं का? त्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? असे प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, माझ्या इतके चांगले संतुलन कोणाचेच नाही. उलट माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे.

बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती
संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. तेव्हा त्यांनी त्यांची माहिती देणारा बेईमान कोपऱ्यात उभा असल्याचे पाहिले आणि त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचं दाखवून दिलं होतं. इतिहासात त्याची नोंद आहे. मी वीर सावरकरांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकार व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे मी थुंकलो कुठे हे मला दाखवा. माझा दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली ती कृती होती. पण त्यांना असं वाटतं असेल लोक आमच्यावर थुंकत आहेत, तर त्यांची ही मानसिकता आहे. त्यांना झोपेतही वाटत असेल लोक आम्हाला जोडे मारत आहेत. हे खरं आहे की, लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. पण मी कशाला ते व्यक्त करु? असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी शिंटे गटाला टोला लगावला.

First Published on: June 3, 2023 11:26 AM
Exit mobile version