टी २० विश्वचषक सामन्यांवर सट्टा; दोघांना अटक, ३.४८ लाख जप्त

टी २० विश्वचषक सामन्यांवर सट्टा; दोघांना अटक, ३.४८ लाख जप्त

टी २० विश्वचषक सामन्यांवर सट्टा लावणार्‍या दोघांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ लाख ४८ हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी, एक नोंदवही असा ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसीम रशीद शेख (४०, रा. गाडेकर मळा, देवळाली गाव) आणि अमोल शिवाजी नागरे (३२, रा. दत्तनगर, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्यांची आहेत. दोघेही दुचाकीवर बसून सट्टेबाजी करत असल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, देवळाली गावात वसीम शेख हा सट्टेबाजी करत असल्याचे माहिती पोलीस अंमलदार देवकिसन गायकर यांना मिळाली. पोलीस तपासत तो बंदिस्त खोलीत न बसता सार्वजनिक ठिकाणी दुचाकीवर बसून सट्टेबाजी करत असल्याचेही गायकर यांना समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे युनिट दोन पथकाने रचला. पोलीस तपासात वसीम व अमोल हे दोघे लोकांकडून पैसे घेत सट्टा लावत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत विजय नंदवाणी याच्या सांगण्यावरून कमीशन घेत सट्टेबाजी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यातून ३ लाख ४८ हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी, एक नोंदवही जप्त केली. वसीम शेख याने दुचाकी (एमएच ०४-झेड डब्ल्यू ५९४९)वर बसून क्रिकेट सामन्याचे, मोबाईलमधील अ‍ॅपवर रन व विकेट असा स्कोर पाहून त्याआधारे पैंजा लावून जुगार खेळून सट्टा चालवित होता.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, सहायक उपनिरीक्षक भामराव भोसले, अंमलदार गायकर, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुगन साबरे, गुलाब सोनार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

First Published on: October 31, 2021 7:31 PM
Exit mobile version