कानेटकर अन् गोदावरी परिचय उद्यानाचा होणार कायापालट

कानेटकर अन् गोदावरी परिचय उद्यानाचा होणार कायापालट
अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत झालेले वसंतराव कानेटकर स्मृती उद्यान आणि गोदावरी परिचय उद्यानाचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकार्‍यांसमवेत या उद्यानाची पाहणी केली.
नाशिक शहर हे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असून परिसरात मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात. या पर्यटकांना प्रभावी ठरेल पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरेल अशा पद्धतीने हे उद्यान विकसित करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी पाहणी केली. ’गोदावरी परिचय उद्यान’ हे  साडेचार एकरात तर कै. वसंतराव कानेटकर उद्यान हे १७ एकर जागेत आहे. ही दोन्ही उद्याने विकसित करावेत  तसेच उद्याने विकसित करतांना पर्यटकांचं आकर्षण ठरतील अशा पद्धतीने अत्याधुनिक नियोजन करण्याचा सूचना आयुक्तांनी विभागीय अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी उपायुक्त शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी, हरिष धांडे, अजिंक्य इनामदार आदी उपस्थित होते.
Attachments area
First Published on: September 5, 2019 11:12 PM
Exit mobile version