भाजपच्या आमदार सीमा हिरे, नगरसेवक शहाणे यांच्यात जोरदार बाचाबाची

भाजपच्या आमदार सीमा हिरे, नगरसेवक शहाणे यांच्यात जोरदार बाचाबाची

स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून त्यांच्याच प्रभागात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना उत्तम नगर येथील बुद्ध विहाराजवळ घडली. काल अमळनेर येथे भाजपच्या बैठकीत झालेल्या बाचाबाचीची पुनरावृत्ती नवीन नाशिककरांना बघावयास मिळाली. या प्रकारामुळे भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

सविस्तर वृत्त असे की, नाशिक पश्चिमचे आमदार सिमा हिरे या त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत उत्तमनगरमधील प्रभाग क्रमांक २९ येथे लोकसभेच्या प्रचारासाठी आल्या होत्या. मात्र याच प्रभागातील नगरसेवक मुकेश शहाणे यांना प्रचारफेरीची कल्पना न दिल्याने शहाणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुद्धविहार येथे आले आणि आमदार हिरे यांच्याशी त्यांची शाब्दीक चकमक उडाली.

हे वाचा – जळगाव राडा प्रकरण – ‘भाजपला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आलं’

 

 

First Published on: April 11, 2019 6:43 PM
Exit mobile version