चाकूचा धाक दाखवत कारमालकाला लुटले

चाकूचा धाक दाखवत कारमालकाला लुटले

चाकूचा धाक दाखवत कारमालकाला लुटले

नीचे पैसा गिरा है अस सांगत चार चोरट्यानी कारमालकाला गाडीतून बाहेर बोलवले. कारमधील कपडे, कागदपत्रे व ६० हजार रूपये लंपास करताना कारमालकाने छटापट केली. कारमालकाला पोटाचा धाक दाखवत चोरटे ६० हजार रूपये घेऊन फरार झाले. ही घटना पिनॅकल मॉलसमोरील रिक्षा स्टॅण्डजवळ घडली. याप्रकरणी दिलीप परशुराम पवार यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप पवार (रा.नंदुरबार) यांनी कार (एमएच ०३, सीपी १२९०) पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यावेळी कारजवळ चार अनोळखी व्यक्ती आले. एकाने कारच्या काचेला टकटक करत नीचे पैसा गिरा है असे पवार यांना सांगितले. पवार पैसे उचलण्यासाठी कारचालकाच्या बाजूकडील चाकाजवळ गेले असता दुसर्‍या चोरट्याने कारचा दरवाजा उघडला. तिसर्‍या व्यक्तीने बँगेतील कपडे, कागदपत्रे, ६० हजारांची रोकड व मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. ही बाब पवारांच्या लक्षात आली. त्यांनी चोरट्यांना विरोध केला असता चोरट्याने पवारांना चाकूचा धाक दाखवत बॅग छोड दो, अशी धमकी दिली. पवारांनी बॅग सोडताच चोरटे फरार झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत.

First Published on: July 23, 2019 4:48 PM
Exit mobile version