नाशिक जिल्हा त्रिशतकाच्या उंबरठ्यावर; मालेगावात 16 नवे पॉझिटिव्ह 

नाशिक जिल्हा त्रिशतकाच्या उंबरठ्यावर; मालेगावात 16 नवे पॉझिटिव्ह 
मालेगावात कोरोनाचे थैमान सुरुच असून, मे महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि.1) मालेगावात आणखी 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  मालेगावात एकूण 274 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. मालेगावात बंदोबस्तासाठी आलेल्या आणखी पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची संख्या 45 झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 298 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
   देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तिसऱ्यांदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारपर्यंत 2 हजार 832 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 298 रुग्ण पॉझिटिव्ह व 2 हजार 115 संशयित रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. मालेगावमुळे नाशिक जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे.

नाशिक कोरोना क्विक अपडेट

पॉझिटिव्ह रुग्ण 298
नाशिक शहर 10
नाशिक ग्रामीण 12
मालेगाव 274 (मृत 12)
परजिल्ह्यातील 02
शनिवारी दाखल रुग्ण 115
मालेगाव 102
झाकीर हुसेन रुग्णालय नाशिक 10
जिल्हा रुग्णालय 03
उपचार घेत असलेले रुग्ण 635 
First Published on: May 1, 2020 7:42 PM
Exit mobile version