यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मुख्यमंत्र्यांचा मंडळांशी संवाद

यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मुख्यमंत्र्यांचा मंडळांशी संवाद

करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे पुढील काळातही नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावेच लागेल त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना मिरवणूका, मोठे देखावे यांना फाटा देत नागरिकांमध्ये आरोग्यदृष्टया जनजागृती करण्याबरोबरच गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व गणेश मंडळांना केले. मुख्यमंत्र्यांनी आज नाशिक येथील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांसमवेत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला.

या चर्चासत्रात नाशिक येथील अशोकस्तंभ गणपती मित्र मंडाळाचे प्रमुख सुनील धुमने, आनंद फरताळे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री यांनी या वर्षी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करण्याचे सूचित केले असून, कोणतेही मोठे देखावे न उभारता मंडळाने नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सीगचे महत्व वाढवण्यासाठी जनजागृती करावी. गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. करोना पार्श्वभूमीवर साधेपणानेच उत्सव साजरा करावा लागेल. याबाबत लवकरच मार्गदर्शन तत्वे जाहीर केली जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांनी आरोग्यदृष्टया जगनजागृतीवर भर द्यावा असे आवाहनही मुख्यमंत्रत्र्यांनी केले.

 

First Published on: June 18, 2020 8:28 PM
Exit mobile version