सुरगाणा तालुक्यातील सिमेंट प्लग बंधारा अचानक फुटला

सुरगाणा तालुक्यातील सिमेंट प्लग बंधारा अचानक फुटला

नाशिक : रात्रीतून सिमेंट प्लग बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी नार नदीपात्रात वाहून गेल्याची घटना सुरगाणा तालुक्यात घडली. या ठिकाणी होणार्‍या जलतरण स्पर्धेपूर्वीच ही घटना उघडकीस आल्याने याविषयी आता परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सिमेंट प्लग बंधार्‍यात जलतरणच्या स्पर्धा आयोजन केले आहे. त्यासाठी सापुतारा येथून या स्पर्धेसाठी होडी आणण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वीच बंधार्‍यातून पाणी नदीपात्रात वाहून गेल्याने स्पर्धकांचा हिरमोड झाला. या बंधार्‍याच्या भरवशावर हजारो शेतकर्‍यांनी खरीप हंगामात गहू, कांदे, हरभरा, भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते.

या पिकांसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. सिमेंट बंधार्‍याची भिंत भक्कम बांधली असली तरी साठवण बंधार्‍याच्या टोकाजवळची माती खंगाळ, केवटाळ, दगड-गोटे, मुरुम, वाळू मिश्रीत लुसलुशीत ठिसूळ माती असल्याने डाव्या बाजूच्या टोकालाच पाणी साठल्याने थोड्या फार प्रमाणात गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याचा साठा नदीपात्रात वाढल्याने नदी पावसाळ्यात वाहते. त्याप्रमाणात दुथडी भरुन वाहत होती. काही काळ पुरस्थिती निर्माण झाल्याने काठावरील गावांना अनेक नागरिकांनी मोबाईलद्वारे बंधरा फुटल्याची माहिती दिली.

First Published on: January 16, 2022 8:45 AM
Exit mobile version