मुंबई-नाशिक लोकलचा मार्ग दृष्टीपथात

मुंबई-नाशिक लोकलचा मार्ग दृष्टीपथात

railway

मुंबई – नाशिकला लोकल सेवेने जोडण्याच्या प्रक्रियेला आता वेग प्राप्त झाला असून येत्या गुरुवारी (दि. १०) उच्च दाब शक्ती असलेली विशेष १२ डब्यांची लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पोहचणार आहे. त्यानंतर या विशेष गाडीची चाचणी होऊन ती प्रवाशांच्या सेवेस दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि नाशिकला लोकल सेवेने जोडण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. नाशिकमधील अनेक जण मुंबईला कामानिमित्त रोजच जात असल्याने रेल्वेची लोकल सेवा मिळाल्यास हा प्रवास अधिक स्वस्त व किफायती होईल असे मानले जात आहे. मात्र कसारा घाटाचा त्याला अडथळा येत होता. मात्र आता लोकलच्या इंजिनात बदल करून त्या चालविणे शक्य आहे, अशी सूचना रिसर्च डिझाईन अ‍ॅन्ड स्टॅन्डर्स ऑरगनाझेशन (आरडीएसओ) यांनी केली आहे. त्यानुसार ही नवी गाडी तयार केली आहे. या गाडीची चाचणी यशस्वी ठरल्यानंतरच आणखी काही गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

सद्यस्थितीत मुंबईहून नाशिक आणि पुण्यासाठी अनेक एक्सप्रेस गाड्या आहे. त्यात डेक्कन क्वीन, पंचवटी, प्रगती, राज्यराणी, सिंहगड या आहे. यामध्ये गर्दीचे प्रमाण अधिक आहे. लोकल सुरू झाल्यास गर्दीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईला मोठ्या प्रमाणात नाशिकमधून भाजीपाला जातो. लोकल सेवा कार्यान्वित झाल्यास संबंधित शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. शिक्षिणासाठी देखील या सेवेचा मोठा उपयोग होऊ शकणार आहे.

नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहे. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणीसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे.
– हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
First Published on: January 6, 2019 8:37 PM
Exit mobile version