महिला, बालकल्याण सभापतीपदी कांडेकर

महिला, बालकल्याण सभापतीपदी कांडेकर

MNC

महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उर्वरित विधी, शहर सुधार आणि वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समित्यांसाठी भाजपबरोबर शिवसेनेनेही अर्ज दाखल केल्याने युतीतच निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधार समिती तसेच वैद्यकीय सहायक व आरोग्य समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. प्रत्येक समितीत एकूण नऊ सदस्य असून त्यातील पाच सदस्य भाजपाचे असल्याने समितीवर याच पक्षाचे वर्चस्व आहे; परंतु भाजपाबरोबरच शिवसेनेने देखील अर्ज भरले आहेत. देशात आणि राज्यात युती आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतदेखील युती व्हावी त्यासाठी सेनेलाही सत्तेचा वाटा मिळावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.

समित्या आणि त्यात अर्ज दाखल करणार्‍यांची नावे पुढील प्रमाणे :

महिला व बाल कल्याण समितीसभापतीपद– हेमलता कांडेकर (भाजपा) उपसभापती– रंजना प्रकाश बोराडे (शिवसेना), डॉ. सीमा ताजणे (भाजपा)

वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समितीसभापती– चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व डॉ. दीपाली कुलकर्णी (भाजपा) उपसभापती– चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व पूनम धनगर (भाजप)

शहर सुधार समितीसभापती– सुदाम डेमसे (शिवसेना), अनिल ताजनपुरे (भाजपा), उपसभापती– सुदास डेमसे (शिवसेना), छाया देवांग (भाजपा)

विधी समितीसभापती– चंद्रकांत खाडे (शिवसेना), सुमन सातभाई (भाजपा), उपसभापती– चंद्रकांत खोडे व सूर्यकांत लवटे (शिवसेना), नीलेश ठाकरे (भाजपा)

First Published on: July 17, 2019 9:06 PM
Exit mobile version