घंटागाडीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

घंटागाडीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

सातपूर-अंबड लिंक रोडवरील अपघातात मृत झालेला रुद्राक्ष.

रुद्राक्ष सुनील मराठे (वय अडीच वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्राक्ष सुनील मराठे हा वडिलांच्या दुचाकी (क्रमांक एम एच ३९-५२२५) वरून सातपूर अंबड लिंक रोडने घरी येत होता. दत्त मंदिर परिसरातील रस्त्यावर घंटागाडी (क्रमांक एम एच १५ यु एफ ८५५) ने अचानक ब्रेक लावल्याने घंटागाडी मागे असलेल्या दुचाकीवरून रुद्राक्ष खाली पडला. नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

First Published on: January 19, 2019 9:20 PM
Exit mobile version