पाण्याच्या बादलीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

पाण्याच्या बादलीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

पंचवटीच्या हनुमानवाडी परिसरात पाण्याच्या बादलीत पडून एका ११ महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, ११ ऑगस्टला घडली. तन्मय दीपक भोये (रा. दळवी चाळ, मोरेमळा, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला. तन्मय खेळता खेळता रांगत घरातील पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेला. उत्सुकतेने त्यात डोकावत असताना तोल जाऊन डोके बादलीत आणि पाय वर या अवस्थेत तो पडला. नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा श्वास कोंडला गेला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने तन्मयला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासत मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

First Published on: August 12, 2019 7:44 PM
Exit mobile version