आदिवासी भागात मिरची, दाळ, तेलाचा तुटवडा

आदिवासी भागात मिरची, दाळ, तेलाचा तुटवडा

नाशिक : ग्रामीण भागात अन्नधान्याचा पुरवठा केला जात असताना आदिवासी भागात आता मिरची, दाळ, तेल, मीठाचा तुटवडा भासू लागला आहे. धान्य पुरेशा प्रमाणात असले तरी भाजी शिजवण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांची उणिव भासत आहे. सुरगाणा तालुक्यातील अधिकार्‍यांनी आपल्या स्तरावर या वस्तूंचे वाटप सुरु केले असून, सामाजिक संस्थांनी मदत केल्यास गरजूंना त्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. राज्यात लॉकडाऊनमळे गावाकडे स्थलांतरित होणार्‍यांचे प्रमाण लक्षणिय आहे. सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील लोक मजूरी, शेतीकामानिमित्त दुसरीकडे जातात. करोनाने त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. घराकडे आलेले मजूर किंवा काम करत असलेल्या ठिकाणी अडकून पडलेल्या व्यक्तींना अन्नधान्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत केवळ धान्य मिळून उपयोग नाही तर त्यांना मिळालेले अन्न शिजवण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांची उणिव भासत आहे.

First Published on: April 5, 2020 5:12 PM
Exit mobile version