जिल्हा रुग्णालयातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

नाशिक जिल्ह्यात परदेशवारी केलेले 411 नागरीक परत आले आहेत. त्यापैकी 319 जणांना आरोग्य पथकांच्या देखरेखेखाली त्यांच्याच घरीच विलगीकरण करून ठेवले आहे. मंगळवारी एकच संशयित रूग्ण जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. जिल्हा रुग्णालयात एकूण संशयित 57 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 56 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा रुग्णालयात मंगळवारी दाखल झालेल्या एका संशयिताचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्रलंबीत आहे. अद्याप एकही करोनो रूग्ण नाशिक जिल्ह्यात आढळलेला नाही. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळला आहे.

नाशिक करोना अहवाल

निगराणीखाली असलेले रुग्ण 411
उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण    57
तपासणी केलेले नमुने 57
निगेटिव्ह रिपोर्ट 56
पॉझिटिव्ह रिपोर्ट 00
प्रलंबित रिपोर्ट 01
मंगळवारी दाखल झालेले रुग्ण 01

शहरात 207 जण परदेशवारी केलेले नागरिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने विविध उपाय योजना केेल्या आहेत. करोनाग्रस्त देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी तपोवनात स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारला आहे. आतापर्यत नाशिक जिल्हयात 411 कोरोनाग्रस्त देशातून नागरिक आले आहेत. त्यापैैकी 207 जण शहरात आले आहेत.

 

First Published on: March 24, 2020 8:19 PM
Exit mobile version