म्हाडा ठेकेदार आणि आडगाव ग्रामस्थांमध्ये अतिक्रमणचा वाद

म्हाडा ठेकेदार आणि आडगाव ग्रामस्थांमध्ये अतिक्रमणचा वाद

म्हाडा ठेकेदार आणि आडगाव ग्रामस्थांमध्ये अतिक्रमणचा वाद

आडगाव येथे म्हाडा ठेकेदाराने आज दशक्रिया विधीची भिंत पडत अतिक्रमण केल्याने ग्रामस्थ आणि म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी यांच्यामध्ये वाद झाला. शासनाच्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरु असलेल्या घरकुल योजनाच्या कामाला सुरवातीपासून आडगाव ग्रामस्थांचा विरोध होता. त्यातच दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि म्हाडा यांच्यामध्ये वाद झाला.

सुरुवातीपासूनच घरकुल योजनेवरून म्हाडा आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद होत होते. यासाठी ग्रामस्थानीं अनेकदा आंदोलन देखील केलेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण निकाली निघाले असताना देखील आज म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी दशक्रियेची भिंत अतिक्रमण मध्ये पाडली.

या कंपाऊंड वॉल तोडण्याचा जाब विचारला असता सबधित बाधकाम ठेकेदाराकडून या ग्रामस्थांना महापालिके कडून परवानगी मिळाली असल्याचे सांगितले. परंतु, आडगावच्या ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवत या ठिकाणचे कंपाऊंड वॉलचे काम बंद करण्यास भाग पाडले.

आडगाव पोलीस पाटील एकनाथ मते, शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनिल जाधव, बालाजी माळोदे,पोपट शिंदे,मयूर मोरे यांनी कंपाऊंड वॉल तोडण्याचे काम रोखले.

First Published on: July 16, 2019 8:25 PM
Exit mobile version