जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये ‘कपडे काढ’ आंदोलन

जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये ‘कपडे काढ’ आंदोलन

जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये ‘कपडेकाढ’ आंदोलनाप्रसंगी दीपककुमार गुप्ता यांना चर्चेसाठी घेऊन जाताना पोलिस कर्मचारी व उपस्थित नागरिक

जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०१७ पासून सुरू आहे. यासाठी ९५ वैद्यकीय आधिकारी, विविध विभागातील कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. यातील २४ जण ३१ नोव्हबेंरला कामावर असल्याची माहिती उघड झाली होती. यासंदर्भात आज ‘कपडे काढ’ आंदोलन करणारे दीपककुमार गुप्ता यांना तीन वेळेस चर्चेला बोलावून शेवटी लेखी आश्वासन देऊन आंदोलनाचा बिमोड करण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण?

जळगावच्या शासकीय महाविद्यालयात ९५ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र यापैकी २४ डॉक्टर हे ३१ नोव्हेंबरला कामावर असल्याचे उघड झाले होते. या संदर्भात अधिक माहितीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी संपूर्ण वर्षभराचे मस्टर मागितले. मस्टर न मिळाल्यास ‘कपडे काढ’ आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. पत्रकार येण्यापूर्वी महाविद्यालयाचे डी. एन. खैरे, दिपककुमार गुप्ता, डॉ. किरण पाटील, अरविंद देशमुख यांच्यात तीन वेळा चर्चा झाली. यासाठी दिपककुमार गुप्ता यांना डॉ. किरण पाटील यांनी कॅबिनमध्ये ओढून नेले. यानंतर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना याप्रकरणाविषयी माहिती मिळताच ते दिपककुमार गुप्ता यांना चर्चासाठी घेऊन गेले होते.

First Published on: January 7, 2019 9:50 PM
Exit mobile version