सप्तशृंगी गडावर ढगफुटीसदृश्य पाऊस; सहा भाविक जखमी

सप्तशृंगी गडावर ढगफुटीसदृश्य पाऊस; सहा भाविक जखमी

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रशृंग गडावर सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे संरक्षक भिंतीवरची दगड, माती वाहून आल्याने सहा भाविक जखमी झाले. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमी झालेले सर्व भाविक एरंडोल आणि नागपूरमधून आलेले होते. गडावर असलेल्या परतीच्या मार्गावर ही घटना घडली. दरम्यान, गडावरील काही वाहनेदेखील वाहून गेल्याची चर्चा आहे.
पावसामुळे गडाच्या पायर्‍यांना धबधब्याचे स्वरुप आले आहे. पायर्‍या उतरताना अंदाज न आल्याने हे भाविक थेट ५० ते ६० पायर्‍या घसरत खाली आले. त्यात काहींच्या डोक्याला तर, काहींच्या पायाला मुकामार लागला. ही घटना देवी संस्थानचे कर्मचारी व स्थानिक व्यापार्‍यांना समजताच त्यांनी जखमींना तातडीने देवी संस्थानच्या दवाखान्यात दाखल केले.

जखमींची नावे

निंबाबाई नाईक (४५, रा. एरंडोल)
पल्लवी नाईक (वय ३, रा. एरंडोल)
शैला आव्हाड (वय ७)
आशिष तारगे (२३, रा. नागपूर)
मनीष राऊत (३२, रा. नागपूर)

First Published on: July 12, 2022 12:49 PM
Exit mobile version