मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज नाशकात

मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज नाशकात

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील कंपोझिट इनडोअर फायरिंग रेंज, अ‍ॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान, सिंथेटिक टॉप व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान व निसर्ग उद्यान प्रकल्प यांचे उद्घाटन सोमवारी (दि.9) दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शंभूराज देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कडोकट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्ती शहानिशा केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.

First Published on: August 8, 2021 11:59 PM
Exit mobile version