जिल्हाधिकार्‍यांचे हटके कलर कॉम्बिनेशन

जिल्हाधिकार्‍यांचे हटके कलर कॉम्बिनेशन

नाविन्याचा सातत्याने ध्यास घेणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे प्रजासत्ताक दिनी एका हटके बाबीसाठी चर्चेत आलेेत. नाशिकमधील तीन वर्षाच्या कार्यकाळात ते प्रत्येक प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयात सपत्निक उपस्थित असतात. यातून एक अनोखी परंपरा त्यांनी सुरु केली आहे. विशेष म्हणजे ध्वजारोहण करण्यासाठी येतांना मांढरे ज्या रंगाचा फेटा बांधतात, त्याच रंगाची साडी मयुरा मांढरे परिधान करतात. त्यामुळे या आगळीवेगळ्या कलर कॉम्बिनेशनची चर्चा रंगली नसेल तर नवलच! नुकत्याच साजर्‍या झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयालाही त्यांनी केलेला पेहराव चर्चेचा विषय ठरला.

First Published on: January 28, 2022 1:21 PM
Exit mobile version