‘भाकप’ नाशिक लोकसभेसह चार विधानसभा लढविणार

‘भाकप’ नाशिक लोकसभेसह चार विधानसभा लढविणार

भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिकमध्ये लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाशिक लोकसभा मतदार संघासह नांदगाव, चांदवड, सिन्नर व नाशिक शहरातील एका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी, असा ठराव करून राज्य समितीला पाठविण्याचा निर्णय भाकप नाशिक जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. आयटक कामगार केंद्र नाशिक येथे व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाकप राज्यसचिव मंडळाचे राजू देसले यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.

नाशिक लोकसभा आणि विधानसभेच्या जागेसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी परिषेद किसान सभा, भाकप वतीने चांदवड येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच कार्ल मार्क्सच्या २०० व्या जयंती वर्ष निमित्त्ताने तालुका पातळीवर व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

First Published on: January 7, 2019 10:14 PM
Exit mobile version