परिसंवादात पोलीस आयुक्तांवर प्रश्नांचा पाऊस

परिसंवादात पोलीस आयुक्तांवर प्रश्नांचा पाऊस

परिसंवादात बोलताना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील.

शहर पोलिसांनी आपला शेजारी हाच खरा पहारेकरी ही योजना सुरु करावी, चोरटे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी रस्त्यांवर चौकाचौकात पोलिसांनी पाहणी करावी, शहरात सीसीटीव्ही लावून करडी नजर ठेवावी, पोलीस नांगरिकांचा मित्र असावा पण तो इतक्या जवळचा नको की त्याने थेट खांद्यावर ठेवावा. पोलिसांचा सर्वांवर वचक असला पाहिजे, अशी विविध मतांद्वारे नागरिकांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. तर, पोलीस आयुक्तांनी नागरिकांना कान व डोळे उघडे ठेवत सजग राहण्याचे आवाहन केले.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील संकल्पनेतून पोलीस व जनता परिसंवाद मंगळवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता चोपडा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस उपायुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वास नांगरे-पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिक हा गणवेश विरहीत पोलीस आहे आणि प्रत्येक पोलीस हा गणवेश परिधान केलेला नागरिक आहे. शहरात त्रिस्तरीय पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. शहरात कोठेही घटनास्थळी पाच ते सहा मिनिटात पोलीस पोहोचू शकतील, अशी सक्षम यंत्रणा तयार केली आहे. नागरिक, दुकानदार, रिक्षाचालक, पानटपरी चालक, हॉकर्स यांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना दिल्यास तात्काळ चोरटे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळता येतील. पोलीस ठाण्यांमधील शांतता समितीची पुनर्रचना केली जाणार आहे. नागरिकांनी सपोर्ट ग्रुप आणि फ्रेशर ग्रुप म्हणून काम करावे. पोलीस अवैध धंदे करणार्‍यांशी हातमिळवणी करत असतील तर नागरिकांनी जागरुक राहून ही बाब तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावे. चांगले काम करत असतील तर कौतुक करा. रात्र गस्तीवर सुमारे ५०० पोलीस आहेत, तर शहरात सुमारे २० हजार सुरक्षारक्षक आहेत, यांचा सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतील. वाईट लोकांना वेगळे करणे आणि चांगल्या लोकांना बरोबर घेत संवाद वाढविणे, हा त्यामागील हेतू आहे.

नागरिकांनी विचारलेले प्रश्न 

First Published on: July 2, 2019 9:01 PM
Exit mobile version