त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुषीत पाणी

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुषीत पाणी

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर गावात दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकार्‍यांकडे केली आहे. वर्षभरापासून ग्रामसेवक गावात फिरकलाच नसल्याने येथील नागरीक हैराण झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गावातील विहिरीची पाहणी केली. विहिरीच्या वरच्या बाजूस संरक्षक भिंतीस झाडे उगवली आहेत. आत चप्पल, कचरा आदी आढळून आल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे दिसून आले. पाण्यात सुक्ष्मजंतू आढळले. त्याचे ओ.टी. परीक्षण केले असता चाचणी निगेटिव्ह आढळली. ग्राम पंचायतीकडे वर्षापासून शिपाई नाही.

फेब्रुवारी 2020 मध्ये पाण्याची तपासणी झाली होती. गावात पोपट नारळे यांची जलसुरक्षक म्हणून नेमणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना मानधन नसल्यामुळे त्यांचे नियमित पाणी शुध्दीकरणाचे काम केलेले नाही. ‘टीसीएल’साठा उपलब्ध करुन शुध्दीकरणासाठी आरोग्यसेवक केशव कपाटे यांनी ग्रामसेवक डी. जे. साबळे यांना वारंवार कल्पना देवूनही त्यांनी ‘लॉकडाऊन’चे कारण सांगितले. साबळे यांची मूळ पदस्थापना खडकओहोळ येथे असून गेल्या वर्षभरापासून वरसविहीरचा अतिरीक्त भार सांभाळतात. दोन्ही गावांमध्ये तब्बल 55 कि.मी. अंतर असल्याने ग्रामसेवकांचे दर्शन गावकर्‍यांना दुर्लभ झाले आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून दर 15 दिवसांनी ग्राम पंचायतीस भेट देतात. याविषयी पंचायत समिती सभापती व ग्रामस्थांनी गट विकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. परंतु, अद्याप कारवाई झालेली नाही. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर, पंचायत समिती सभापती मोतिराम दिवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश मोरे, डॉ.आशिष सोनवणे, आर.एस. पाटील, केशव खंडारे, ग्रामसेवक डी. जी. साबळे यांनी चौकशी अर्जावर स्वाक्षरी केली. यावेळी ज्ञानेश्वर देशमुख, भगवान दिवे, किसन जावळे, धोंडीराम डगळे, काळु ढोरे, रामा ढोरे, काशिनाथ बेंडकोळी गुलाब दिवे, आनंदा पारधी, अमृता किलबिले, पप्पु किलबिले, महादु देशमुख, अंबादास देशमुख, मंगेश किलबिले, गोकुळ ढोरे, नामदेव दिवे, भिका दिवे, बुधा ढोरे, चंदर डगळे, मनोहर किलबिले उपस्थित होते.

First Published on: May 20, 2020 8:15 PM
Exit mobile version