Corona : नाशिक शहरात ओसरतोय अन जिल्ह्यात वाढतोय

Corona : नाशिक शहरात ओसरतोय अन जिल्ह्यात वाढतोय

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. गत नऊ दिवसांत एकदाही हजारीपार नवीन रुग्ण नाशिक शहरात आढळून आलेले नाहीत. गुरुवारी (दि.८) दिवसभरात ७३६ नवे रुग्ण आढळून आले असून १ हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारअखेर २ लाख ९१ हजार २४१ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ८३ हजार ५७४ रुग्ण कोरोनाबाधित आणि २ लाख ६ हजार १६० रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. दिवसभरात ७३६ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण ३१४, नाशिक शहर ३९४, मालेगाव २४ आणि जिल्ह्या बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहरातील प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात १ हजार १७९ संशयित रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय १०, नाशिक महापालिका रुग्णालय १ हजार २५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १३, मालेगाव रुग्णालय ११ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालय १२० आहेत.

जिल्ह्यात ८९७९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात ८३ हजार ५७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असले तरी ७३ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ८ हजार ९७९ रुग्ण अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ४ हजार २२३, नाशिक शहर ४ हजार २३९, मालेगाव ४०६ आणि जिल्ह्या बाहेरील १११ रुग्ण आहेत.

First Published on: October 8, 2020 8:02 PM
Exit mobile version