ओंडली येथे आढळला मृत बिबट्या

ओंडली येथे आढळला मृत बिबट्या

इगतपुरी तालुक्यातील ओंडली गावाच्या हद्दीत बुधवारी (२४ जुलै) सकाळी भाताच्या खाचरात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. गणेश हंबरे या शेतकर्‍याने ही माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याचा पंचनामा केला. नर जातीचा हा बिबट्या चार-पाच दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज आहे.

प्रारंभ गणेश हंबरे यांना बिबट्या भाताच्या शेतात दिसला. त्याने आरडाओरडा करून नागरिकांना बोलावले. बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो मृत असल्याचे आढळून आले. तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन व परिसरात काही महिन्यांपासून चार ते पाच बिबट्यांचे दर्शन होत आहे. पासलकर वस्तीजवळील पोल्ट्री फार्मजवळ एक बिबट्या रात्री आठ वाजता येवून गेला होता. तर, राजाराम पासलकर यांचे वासरु बिबट्याने १५ दिवसांपूर्वी रात्री घराजवळ नेले. या घटनांमुळे मळे वस्तीमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

First Published on: July 24, 2019 5:51 PM
Exit mobile version