डिजिटल शाळा ग्रामीण शिक्षणाचा पाया

डिजिटल शाळा ग्रामीण शिक्षणाचा पाया

भारताला बलशाली राष्ट्र म्हणून पुढे यायचे असेल तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान ही जागतिकीकरणाची भाषा आहे. आज अर्थ व्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांना डिजिटल करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती झाल्याशिवाय डिजिटलची व्याप्ती वाढणार नाही. डिजिटलमुळे कला क्षेत्रात क्रांती होईल.

संशोधनाच्या ग्रामीण भागात विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनाबाबत आजही उदासीनता दिसून येते. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून सरकारने वेगवेगळे प्रकल्प हाती घ्यावे. जागतिक पातळीवर भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी डिजिटलचा पर्याय शिक्षण क्षेत्रात स्वीकारणे काळाची गरज आहे. अर्थ संकल्पातही आधुनिक शिक्षण प्रणालीस डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. डिजिटल तंत्रज्ञान मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापराचा लाभ मिळणार आहे. डिजिटलच्या माध्यमातून भारतात कौशल्य विकास संकल्पना राबवता येईल.या योजने अंतर्गत कौशल्य विकासाला चालना दिल्यामुळे बेकारीच्या समस्येवर मात करता येईल.

तरुणांना ग्रामीण व शहरी भागात स्वत: कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरु करता येतील.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढायला मदत होईल. 1 फेब्रुवारी 2017 च्या अर्थ संकल्पात 100 आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. हे केंद्रे त्वरीत सुरु झाल्यास या माध्यमातून शिक्षण घेणार्‍या तरुणांना देशाबाहेर रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होईल.देशातील 3 कोटी बेकार युवकांना बाजारपेठेशी संलग्न प्रशिक्षण प्राप्त झाल्यास त्यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती होईल. डिजिटलच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आमुलाग्र बदल घडविण्याची मोठी संधी आहे.म्हणून आधुनिक शिक्षण प्रणालीला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.डिजिटलमुळे शिक्षक व विद्यार्थी अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा वाटते. यानिमित्ताने शिक्षक दिनानिमित्त मी असे नमूद करते की नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जातांना शाळा शिक्षक विद्यार्थी डिजिटल होणे आवश्यक आहे.यासाठी वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर प्रयत्न करायला हवे असे माझे मत आहे.डिजिटल शाळा ? राबवणे गरजेचे आहे.

: सविता शांताराम देशमुख

 

First Published on: September 5, 2022 3:58 PM
Exit mobile version