नाशिक पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप

नाशिक पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने पोलीस यंत्रणेचा ताण वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये पोलीस चौकाचौकात कर्तव्य बजावत कोरोना संसर्गाचा मुकाबला करत आहेत. त्यांना आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सुरक्षा साधन संचाचे (किट), मास्कचे वाटप करण्यात आले.

नाशिक शहरात ३ हजार ५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ते कर्तव्य बजावत असताना त्यांचा अधिकाधिक जनसंपर्क असतो. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा किटचे वाटप करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस प्रशासन व दिपक बिल्डर्स, सोनी गिफ्ट यांच्या सहकार्याने किट तयार करण्यात आले आहेत. या किटमध्ये सॅनिटायझर, मास्क, लिक्वीड सोप, साबण, सी व्हीटनिच्या गोळ्या असे सुरक्षा साहित्य आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांच्या संरक्षणासाठी ६०० किट्सचे वाटप करण्यात आले. पोलीस मुख्यालय व शहरातील सर्व पोलीस वसाहतींमध्ये पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त मनोज करंजे, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस उपनिरिक्षक कैलास सोनवणे यांच्या हस्ते किटसचे वितरण करण्यात आले.

पोलीस वसाहतनिहाय किटचे वाटप

स्नेहबंधन पार्क १७५
पाथर्डीफाटा २४०
नाशिकरोड ११०
देवळाली कॅम्प ७५
एकुण ६००

First Published on: April 5, 2020 7:33 PM
Exit mobile version