सावधान! एप्रिल फुल करणे पडणार महागात

सावधान! एप्रिल फुल करणे पडणार महागात

फेसबुकला पिछाडीवर टाकत टिकटॉकची आघाडी

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेकजण आपले मित्र परिवारांना एप्रिल करत असतात, त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. मात्र, आता व्हॉट्सअप, फेसबुक, कॉलवरून एखाद्याला एप्रिल फूल करणे महागात पडणार आहे. सोशल मीडियावर करोना संबंधित मेसेज करून एप्रिल फूल करत समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्यास मेसेज टाकणारा  आणि ग्रुप अँडमिनवरही थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

करोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांनी घरीच बसावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस करत आहेत. तरीही, काहीजणांना घरात स्वस्थ बसवत नसल्याने करोना संदर्भात उलटसुलट मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करताना दिसत आहेत. चुकीचे मेसेज, खोटी माहिती पसरवणा-या आणि व्हायरल होणा-या मेसेजेसवर पोलिसांची करडी नजर आहे.

जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे कोणतेही संदेश, छायाचित्र अथवा व्हिडीओ एप्रिल फूल म्हणून सोशल मिडीयावर पसरवू नयेत, यासाठी नाशिक पोलिसांनी मनाई आदेश काढले आहेत. चुकीच्या संदेशामुळे संचारबंदी नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता असून, यामुळे पोलिस दलासह प्रशासनावर अतिरिक्त ताण पडू शकतो. जर अशा स्वरूपाचे संदेश, छायाचित्र, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तर व्हायरल करणाऱ्या व ग्रुप अॅडमिनविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ग्रुप अॅडमिनला सूचना

खबरदारी म्हणून ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुप सदस्यांना सुचना द्याव्यात. फक्त ग्रुप अॅडमीन संदेश टाकू शकेल, अशी सेटिंग्ज करून घ्यावी,  सोशल मिडीयावर पोलिसांची करडी नजर असून, करोनाचा धोका लक्षात घेता प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी.

लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त

First Published on: March 31, 2020 10:53 PM
Exit mobile version