महाराष्ट्रात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स’चा वापर – पाशा पटेल

महाराष्ट्रात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स’चा वापर – पाशा पटेल

पाशा पटेल

राज्यात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स‘ चा वापर सुरू करणार आहे. कांद्याचा प्रश्न सुटला तर सगळ्या शेतकर्‍यांचा प्रश्न सूटेल. सगळ्यात अवघड प्रश्न हा कांद्याचा झाला आहे. याच कांद्याने आता पर्यंत तीन राज्याची सरकार पाडली आहे. यामुळे लासलगाव म्हटले की घामच फुटतो, असे प्रतिपादन राज्य कृषि आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज येथे भेटी दरम्यान दिले. कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ९ व १० जानेवारीला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहेत. तसेच तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्याचे हि मान्य केल्याचे जळगाव येथून पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी जात असताना लासलगाव येथे मुक्कामी थांबलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

निर्यात जैसे ते असल्याने कांद्याला भाव मिळत नाही. या साठी दीर्घ मुदतीचे धोरण ठरवने आवश्यक आहे. देशात कृषीदुताची नेमनुक करुण त्यांना त्या देशात कृषी मालाची काय मागणी आहे त्याचा विचार करुण आपल्याला परदेशी बाजारपेठेत आपला शेतमाल निर्यात करता येईल अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याशी बैठकीत केली असता त्यांनी लागलीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १० देशात कृषीदूत ची निवड केली आहे.

शेतीसाठी ‘ड्रोन्स’चा होणार वापर

भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, अचूक निदान यासह विविध कारणांसाठी वापर करण्यात येणार आहे.

First Published on: January 4, 2019 7:00 AM
Exit mobile version