नाशिक जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा-खा.डॉ. भारती पवार य़ांची मागणी

नाशिक जिल्हयात  दुष्काळ जाहीर करावा-खा.डॉ. भारती पवार य़ांची मागणी

agriculture pump

          राज्यासह नाशिक जिल्हयात पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असल्याने नाशिक जिल्हयात आलो दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हयात नुकसानीचे सरसकट पंचनामे करून, शेतकजयांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी देखील त्यांनी पत्रात केली आहे.
खासदार डॉ. पवार यांनी यासंदर्भात, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्र पाठवित ही मागणी केली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हयातील निफाड, येवला, नांदगाव, कळवण, सुरगाणा, देवळा, पेठ यांसह सिन्नर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पीकांची हानी झाली आहे तर, वादळामुळे मका आडवा पडला आहे. कांदा शेतात पाणी साचल्याने कांदा सडला आहे. भुईमुग, ज्वारी, बाजारी तसेच द्राक्षबागांचेही नुकसान झाले आहे. पंठ, सुरगामा, कळवण, इगतपुरी भागातील भात, नागली पिके वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक भागात शेतात पाणी साचले असल्याने कडधान्याचेही नुकसान झाले आहेत. कोविड संकटाने शेतकरी हतबल झालेले असतानाच अतिवृष्टीचे संकट शेतकजयांवर कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थिीतीत नाशिक जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकजयांना शासनाने त्वरीत मदत जाहीर करावी. एकरी २५ हजार रूपये मदत शेतकजयांना देण्यात यावी अशी मागणी डॉ. पवार यांनी दिलेल्या पत्रात केली आहे. तसेच कृषीमंत्री दादा भुसे यांना पत्र देऊन शेतकर्यांना मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकट -जिल्हाधिकार्‍यांशी साधला संवाद
दरम्यान, जिल्हयात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर सुरू असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून दोन दिवसांपासून प्राप्त झाल्याचे खासदार डॉ. पवार यांनी सांगितले. ठराविक गावांमध्येच पंचनामे केले जात असल्याचे शेतकजयांकडून सांगण्यात येत आहे. यावर, डॉ. पवार यांनी जिल्हाधिकारी सूरज माँढरे यांच्याशी संवाद साधत, शेतकजयांच्या तक्रारींची नोंद घ्यावी, नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

First Published on: September 29, 2020 5:05 PM
Exit mobile version