बिअरबारमध्ये मद्यपीने फाडले पोलिसाचे कपडे

बिअरबारमध्ये मद्यपीने फाडले पोलिसाचे कपडे

मद्यपान

बिअरबारमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरुन मद्यपीने मॅनेजरला शिवीगाळ आणि मारहाण केली. पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करत एका पोलिसाचे कपडे फाडले. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री एक वाजता सातपूर औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल श्यामसुंदर बियरबारमध्ये घडली. सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. योगेश फुला हिरे (वय ३२ रा. खुंटवटनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल श्यामसुंदर बियरबारमध्ये योगेश हिरे याने दारु पिली. दारु पिवून झाल्यानंतर पैसे न देता तो निघून जाऊ लागला असता मॅनेजर तफनकुमार शिवप्रसाद साव यांनी पैसे मागितले. राग अनावर झाल्याने त्याने साव यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. हॉटेलच्या गल्ल्यातील पाचशे रुपये बळजबरीने काढून घेत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पोलीस शिपाई जावेद खलील शेख त्याला समजावून सांगत होते. मात्रव आरोपीने रागात त्यांनाही शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यावेळी पोलीस हवालदार सूर्यवंशी मोबाईलने रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर फेकला. शेख यांचे कपडे फाडले. आता तुमची नोकरी घालवितो, बाहेर सुटल्यावर तुमचा बेत पाहतो, अशी त्याने शेख यांना धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मजगर करत आहेत.

First Published on: November 11, 2019 5:38 PM
Exit mobile version