अकरावीचा निकाल ऑनलाईन

अकरावीचा निकाल ऑनलाईन

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अकरावीचा निकाल ऑनलाईन प्रसिध्द झाला आहे. विद्यालयायतील 960 विद्यार्थ्यांना हा निकाल महाविद्यालयाच्या www.kvnacs.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात विज्ञान शाखेचे सर्वाधिक 480, वाणिज्य शाखेचे 360 व कला शाखेचे 120 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. पी. आर. गीते, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अ‍ॅड. तानाजी जयभावे, विश्वस्त, संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांच्यासह उपप्राचार्य प्रा. दिलीप कुटे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. कैलास गीते यांनी अभिनंदन केले आहे.

शाखानिहाय विद्यार्थी

First Published on: May 27, 2020 2:57 PM
Exit mobile version