विल्होळी शिवारात बेकायदा मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

विल्होळी शिवारात बेकायदा मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

लॉकडाऊन असतानाही बेकायदा दारूचा साठा करणाऱ्या दोघांना शुक्रवारी (दि.24) विल्होळी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे देशी दारू मदिराच्या 2 हजार 500 सीलबंद बाटल्या असा सुमारे 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवनाथ चंदू धोगंडे (२६, रा.सारुळ, ता.जि. नाशिक), प्रकाश कन्हैयालाल खेमाणी (59, रा.बोधलेनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नाशिक जिल्ह्यात बेकायदा मद्यसाठा करून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि.24) नाशिक तालुक्यातील विल्होळी शिवारात सापळा रचला. एका घरात पथकास मध्यप्रदेशमध्ये विक्रीस मान्यता असलेल्या देशी दारू मदिरा 180 मिलीच्या 2 हजार 500 सीलबंद बाटल्या असा सुमारे 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. छापा दुय्यम निरीक्षक आर. आर.धनवटे, एम. आर.तेलंगे, सी.एच. पाटील, जवान विजेंद्र चव्हाण, जी. आर. तारे, आर. बी. झनकर, के.सी.कदम, डी. के.गाडे आदींनी टाकला.

First Published on: April 24, 2020 6:05 PM
Exit mobile version