शेगावच्या ‘आनंदसागर’ला ३० वर्षांची मुदतवाढ

शेगावच्या ‘आनंदसागर’ला ३० वर्षांची मुदतवाढ

शेगाव येथील आनंदसागर प्रकल्पाचे भव्य व आकर्षक प्रवेशद्वार

विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र शेगाव येथील ‘आनंदसागर ’ या पर्यटनस्थळाला महाराष्ट्र शासनाने पुढील ३० वर्षासाठी वाढीव लीज मंजूर केले आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या देखभालीसह नवीन प्रकल्पांच्या कामांनाही गती लाभणार आहे.

शेगाव हद्दीतील ही जागा १९९९ – २००० मध्ये शेगाव श्री संस्थानने तलाव सौंदर्यीकरण व विकास प्रयोजनासाठी रितसर अर्ज करून शासनाकडे मागितली होती. ही १०१ हेक्टर ७२ आर.पडीत जमीन संस्थानला सरकारकडून मिळाली. अवघ्या १५ वर्षात संस्थानने या परिसराचा कायापालट केला. एक जागतिक दर्जाचे सुंदर पर्यटनस्थळ येथे उभारले. देशभरातून भक्त येथे येतात, शिवाय विदेशातूनही पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. या तलावातून शिर्डी-नागपूर सी-प्लेन हवाई सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याची ट्रायल मागील वर्षी नागपूर व शेगाव येथे झाली. या विकसित केलेल्या जागेचा करार संपल्याने संस्थानने सन २०१२ मध्ये वाढीव लीजसाठी सरकारकडे विनंती अर्ज केला होता. ४ वर्षापासून हा अर्ज प्रलंबित होता. शासनाने एका आदेशाव्दारे नुकतीच ३० वर्षाची लीज संस्थानला वाढवून दिली. त्यामुळे श्री संस्थान आता नव्या जोमाने या आनंद सागर परिसरात विकासकामे व सौंदर्यीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: May 25, 2019 9:46 AM
Exit mobile version