अखेर कोर्टाकडूनच दिलासा; बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणूकीचा मार्ग मोकळा

अखेर कोर्टाकडूनच दिलासा; बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणूकीचा मार्ग मोकळा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला सहकार, पणन विभागाचे राज्याचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांनी मंगळवारी (दि.९) आदेश काढत स्थगिती दिली होती. याविरोधात देवीदास पिंगळे यांनी उच्च न्यायालयात रिटपिटिशन दाखल केली होती. यावर शुक्रवारी (दि.१२) रोजी निकाल देतांना उच्च न्यायालयाने सदर स्थगिती हटवत निवडणूक घेण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत.

नाशिक बाजार समितीमध्ये निवडणुकीत विजयी झालेल्या काही संचालकांवर कथित धान्यवाटप घोटाळ्यासंबंधी आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या संचालकपदाची पात्रता अंतिम होत नाही. तोपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्याचा आदेश दिले होता. २८ एप्रिल रोजी मतदान आणि २९ एप्रिल रोजी मतमोजणी झाली. यात पिंगळे गटाने १२ जागा तर चुंभळे गटाने सहा जागांवर विजय मिळवला होता. या प्रक्रियेला १० ते १२ दिवसांचा अवधी उलटल्यामुळे सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, यासाठी पिंगळे गटाने दोनच दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लेखी मागणी केली होती. त्यातच शिवाजी चुंभळे यांनी कथित धान्य घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि. ४ मे रोजी सुनावणी झाली. परंतु सुनावणीच्या वेळी प्रतिवादी यांनी त्यांची बाजू मांडताना नमूद केले होते की, वादी यांनी ८ दिवस विलंबाने अपिल दाखल केले आहे.

पिंगळे विरुद्ध चुंभळे सामना रंगलेलाच

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बाजार समितीची निवडणूक पार पडून निकाल लागलेले असले तरी पिंगळे विरुद्ध चुंभळे सामना मात्र अद्यापही रंगलेलाच आहे. बहुमत मिळाल्याने एकीकडे पिंगळे गट सभापती- उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे मात्र ही निवडणूक प्रक्रिया लांबावी, किंबहुना, होऊच नये, यासाठी चुंभळे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. यात कधी पिंगळे गटाची सरशी होतेय तर कधी चुंभळे गट आघाडी घेताना दिसतोय.

का होती स्थगिती?

नाशिक बाजार समितीचा निकाल २९ एप्रिल रोजी लागला. यात पिंगळे गटाने १२ जागा तर, चुंभळे गटाने सहा जागांवर विजय मिळवला. या प्रक्रियेला १० ते १२ दिवसांचा अवधी उलटल्यामुळे सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, यासाठी पिंगळे गटाने दोनच दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लेखी मागणी केली होती. मात्र, कथित धान्यघोटाळाप्रकरणी झालेल्या सुनावणीत उपसचिवांनी निवडणुकीवर स्थगिती आणली होती.

First Published on: May 13, 2023 2:43 PM
Exit mobile version