दीड कोटींची खंडणी मागणारे पाच गजाआड

दीड कोटींची खंडणी मागणारे पाच गजाआड

Arrest

चांगदेव रामभाऊ घुमरे (६४, डिसुझा कॉलनी, गंगापूर रोड) बांधकाम व्यवसाय करतात. मनोज सीताराम कुंभारकर (३१, चौधरीमळा, पंचवटी), मनोज श्यामराव पाटील (२८, मोरेमळा, हनुमानवाडी,पंचवटी), पंकज सुधाकर सोनवणे (२६, अंबड) या तिघांनी पाच महिन्यांपूर्वी घुमरेंकडे दीड कोटीची खंडणी मागितली होती. त्यांनी घुमरेंकडून पाच महिन्यांत २ लाख रूपये उकाळले. त्यानंतर पुन्हा त्यांना धमकी देत २ लाख रुपये उकळले. त्यांनी १९ जानेवारीला पुन्हा खंडणीची उर्वरित रक्कम मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे वारंवार पैशांचा तगादा लावल्याने त्यांनी हिमतीने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी तपास हाती घेत पाच जणांना अटक केली.

First Published on: January 23, 2019 8:08 PM
Exit mobile version