शिकाऊ डॉक्टरच्या संपर्कातील पाच क्वारंटाईन

शिकाऊ डॉक्टरच्या संपर्कातील पाच क्वारंटाईन

जिल्हा शासकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणार्‍या चोवीस वर्षीय डॉक्टरची रात्री उशिरा कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या पाचही जणांना होम क्वारंटाईन
करण्यात आले असून त्यांच्या रूम पार्टनर ला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान किशोर सुर्यवंशी मार्ग वृंदावन नगरसह इतरही व जवळपास परिसर सील करण्यात आला आहे
. सध्या कोरोना विषाणू ने जगभरात थैमान घातले आहे.या वर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

.शासकीय रुग्णालयातील शल्य चिकित्सक, मुख्य वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,परिचारिका ,वार्ड बॉय ,शिकाऊ डॉक्टर व नर्सेस कोरोना विरूद्ध लढा देत आहेत.त्यातच येवला येथील कोरोना रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेले जिल्हा शासकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणार्‍या चोवीस वर्षीय डॉक्टरांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह असल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली. कोरोना पॉझिटिव्ह शिकाऊ डॉक्टर हा आदीवासी भागातील सुरगाणा तालुक्यातील हातरुंडीजवळील तळपाड्याचे आहेत.परंतु ते प्रभाग क्रमांक एक मधील किशोर सुर्यवंशी मार्ग येथील चित्रलेखा सोसायटी वास्तव्यास होते.ही माहिती मनपा प्रशासनास समजताच विभागीय अधिकारी विवेक धांडे,वैद्यकीय अधीक्षक विजय देवकर आणि पथकाने पाहणी केली व सदरचा संपूर्ण परिसर हा निर्जंतुकीकरण करून घेण्यात आला. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि त्यांच्या सोबत चित्रलेखा सोसायटी रूम पार्टनर यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जवळपास दोनशे ते तीनशे मीटर परिसर हा सील करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

कंटेनमेंट झोन तयार केला आहे. पोलीसानी लोकल बँरिकेटिंग चे काम सुरू आहे.नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे.रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर हा सील केला जाईल.

विवेक धांडे

विभागीय अधिकारी,पंचवटी विभाग

परिसरात नाकाबंदी

मनपा प्रशासनाच्या मार्गदर्शनखाली आवश्यक तो परिसर सिल करणार असून ठीक ठिकाणी बँरेकेटिंग करुन नाकाबंदी करण्यात आले आहे तसेच प्रतिबंधित केलेल्या ठिकाणी २४तास पेट्रोलिंग करण्यात येणार आहे

पंढरीनाथ ढोकणे

वरिष्ठ पोलिस निरीक्षक  म्हसरुळ पोलिस स्टेशन

First Published on: April 27, 2020 6:24 PM
Exit mobile version