शाळेतील पाच विद्यार्थिनींचा विनयभंग

शाळेतील पाच विद्यार्थिनींचा विनयभंग

प्रातिनिधीक फोटो

शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षकाने पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (२३ मार्च) उघडकीस आला.

याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, शाळा प्रशासनाकडून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. आठ दिवसांपूर्वी विनयभंगाचा प्रकार पुढे येऊनही संबंधित संस्थेने त्या शिक्षकावर कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार करत पीडित विद्यार्थिनींच्या संतप्त पालकांनी शाळेत जाऊन या प्रकाराचा जाब विचारला. पीडित विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीने शाळा सोडून दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, संशयित शिक्षकानेही या घटनेनंतर नोकरी सोडल्याचे सांगण्यात आले.

First Published on: March 24, 2019 8:12 AM
Exit mobile version