उड्डाणपुलावरील पाण्यामुळे वाहनधारकांना अभिषेक

उड्डाणपुलावरील पाण्यामुळे वाहनधारकांना अभिषेक

मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला असला तरी या उड्डाणपुलाच्या कामातील बेजबाबदारपणा वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळी पाणी पुलाखालून जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर व वाहनांवर पडत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग उड्डाण पूल बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. हा उड्डाणपूल बनविताना उच्च प्रतीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले. असे असताना पावसाळा सुरू होताच नागरिकांना उड्डाणपुलाखालून पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलावरील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पाईपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे पाईप चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने अथवा त्यांची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याने या उड्डाणपुलावरून येणारे सर्व पाणी उड्डाणपुलाखालील वाहनांवर मोठ्या प्रमाणात सातत्याने पडते आहे. चारचाकी वाहनांवर पडले तर ठीक मात्र दुचाकी चालक अंगावर हे पाणी पडू नये म्हणून या पाण्यापासून वाचण्याच्या नादात वाहांनाचा तोल अथवा वाहनांवरील नियंत्रण बिघडल्याने त्यांच्या दुचाकींद्वारे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

फुटलेल्या पाईपांमुळे कामाचा दर्जा उघड

उड्डाणपुलावरील पाणी खाली वाहून नेण्यासाठी जे पाईप लावण्यात आलेले आहेत. ते पाईप बहुतेक ठिकाणी फुटले आहे. यामुळे पाणी पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोसळून खालील रस्त्यांना खड्डे पडत आहेत. यामुळे पाईपच्या कामाचा दर्जा उघड झाला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

First Published on: June 12, 2021 5:02 PM
Exit mobile version