मध्य प्रदेशातील अपघातात नगरचे चौघे ठार

मध्य प्रदेशातील अपघातात नगरचे चौघे ठार

अपघातात मृत झालेले भगवान वाकचौरे व पत्नी वंदना वाकचौरे.

सुरगाणा तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत भगवान भागवत वाकचौरे (वय ४८, रा. विरगाव, ता. अकोले, जि. नगर) हे कुटुंबासमवेत सुटीनिमित्त देवदर्शन करुन मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील ठिकरी गावाजवळ प्रवास करताना अल्टो कारवरील नियंत्रण सुटल्याने भगवान वाकचौरे, पत्नी वंदना वाकचौरे (वय ४२), मुलगी आकांक्षा वाकचौरे (वय १६), पुतण्या संकेत चंद्रभान वाकचौरे (वय २६) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.

कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढून कार खोल नाल्यात कोसळली. याक्षणी पियुष वाकचौरे (वय १२) हा कारचा दरवाजा उघडला गेल्याने बाहेर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने विरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. भगवान वाकचौरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून या पदावर पोहचले होते. विरगाव येथे रात्री उशीरा अंत्यविधी करण्यात आला.

First Published on: May 25, 2019 7:47 AM
Exit mobile version