शुक्रवारपासून बेकरी उत्पादने महागणार

शुक्रवारपासून बेकरी उत्पादने महागणार

कराची बेकरी

गरमागरम चहासोबत ब्रेड, बटर, बिस्किट आणी खारीने दिवसाची सुरुवात करणार्‍या नाशिककरांसाठी बेकरी संघटनेचा हा निर्णय चांगलाच कडवट ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरातील बेकरी व्यवसायानेही कात टाकली आहे. मात्र, बाजारात डिझेल, पेट्रोल व वाहतुकीच्या दरांतील वाढ आणि बेकरी उत्पादनांसाठी आवश्यक साखर, मैदा, तेल, कारागीरांचा खर्च यांत 3५ टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे बेकरी चालकांना व्यवसाय सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर बेकरी उत्पादनांमध्ये २० टक्के भाववाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुनील मानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

छोटया आकाराच्या पावांच्या लादीमध्ये २४ नग व जम्बो आकाराच्या पावांच्या लादीमध्ये १५ नग असतात. या ८०० ग्रॅम वजनाच्या लादीच्या दरांत ७ रुपये वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुल शिंदे, सलीम शेख, हसन खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दृष्टीक्षेपात

* 00 वजनाची विविध आकारातील पावलादी ७ रुपयांनी महाग

* नानकटाई १२० ऐवजी १६० रुपये प्रतिकिलो

* खारी, टोस्ट, डोनट,क्रीमरोल २० टक्के महाग

असे वाढणार दर

खाद्य पदार्थ पूर्वीचे दर नवे दर

पाव लादी 30 37

क्रीमरोल 50 60

नानकटाई 120 160

बाजारात किराणा माल, पेट्रोल, सिलेंडर महाग झाले आहे. वाढत्या महागाईमुळे शहरातील सुमारे १०० बेकरी चालक व मालकांना तारेवारची कसरत करावी लागते आहे. ही दरवाढ बेकरी चालक व मालकांच्या एकमताने शुक्रवार (दि.१०)पासून करण्यात आली आहे.

सुरेश मानकर, अध्यक्ष, नाशिक बेकरी चालक व मालक संघटना

माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्या काळात पाव उत्पादकांना कच्च्या मालावर सवलत दिली जात होती. त्यानंतर अद्यापपर्यंत सवलत मिळालेली नाही. महागाईचा बेकरी व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किंमत नियंत्रणासाठी सरकारने बेकरी व्यावसायिकांना पाणी, वीज व कच्च्या मालावर सवलत द्यावी.

फैय्याज खान, बेकरीचालक

First Published on: January 9, 2020 8:11 PM
Exit mobile version