मालेगावी जुगार अड्डयावर छापा; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगावी जुगार अड्डयावर छापा; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

मालेगाव नाका भागात जुगार अड्डयावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकला. यातील २४ संशयितासह भाजप माजी महानगराध्यक्ष सुनील गायकवाड यांचे विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या पथकाने ७ एप्रिलला रात्री १ ला सटाणा नाका येथील एकता जिमखानालगत गुदामामध्ये छापा टाकला. याठिकाणी जुनेद अहमद रफीक, शेख सईद शेख बशीर, मनोज शेलार, सैयद लाल सैयद नबी, बापू खैरनार, मोहन पवार, संजय गंगावने, राकेश शिंदे (मॅनेजर), प्रकाश पाटिल, रोहिदास लोंढे, राजेंद्र यशोद, अनिल पगार, अनिल गायकवाड, दत्तात्रय अमृतकर, शेख शारिब शेख अब्बास, अखिल शहा सरदार, मोहम्मद शाबान गुलाल, शेख अनीस शेख रशीद, अनिल पिंगळे, प्रशांत भावसार, नंदू पाटील, किशोर जाधव, सुभाष आहिरे, अजीज नूर मोहम्मद, गुदाम मालक सुनिल गायकवाड (फरार) हे बेकायदेशीर जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख १ लाख ९० हजार ३९० सह १० मोटर सायकल, १ रिक्षा अंदाजे किंमत रुपये ५ लाख ५ हजार रूपये व ८७ हजार ५०० रुपये किमतीचे २५ मोबाइल, असा ७ लाख ८२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

First Published on: April 9, 2019 9:20 AM
Exit mobile version